• February 6, 2025
  • No Comment

खंडणी न दिल्याने भाजी विक्रेत्याच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपी अटक

खंडणी न दिल्याने भाजी विक्रेत्याच्या गळ्यावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपी अटक

    खडकी (पुणे):भाजी विक्रेत्याने खंडणी न दिल्याने त्याची भाजी फेकून देऊन त्याच्या गळ्यावर, गालावर चाकूने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

    मनोज स्वामी (रा. इंदिरानगर, खडकी) असे या खंडणीखोराचे नाव आहे. याबाबत शौकत बाबमिया (वय ३६, रा. दर्गा वसाहत, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खडकीतील संजय गांधी भाजी मंडईमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत बाबमिया यांचा खडकी भाजी मंडईमध्ये भाजीचा गाळा आहे. ते भाजी विकत असताना मनोज स्वामी तेथे आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे खंडणी म्हणून पैशांची मागणी केली. शौकत यांनी पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा मनोज याने त्याची भाजी उचलून फेकून दिली. चाकूने त्यांच्या गळ्यावर व डाव्या गालावर वार करुन गंभीर जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी मनोज स्वामी याला अटक केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *