• February 6, 2025
  • No Comment

धनकवडीतील संभाजी नगर परिसरात तरुणावर चार पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने केला हल्ला, आरोपी फरार

धनकवडीतील संभाजी नगर परिसरात तरुणावर चार पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने केला हल्ला, आरोपी फरार

    बिबवेवाडी: बिबवेवाडी येथे भरदुपारी झालेल्या गोळीबारीच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी धनकवडीतील संभाजी नगर परिसरात एका तरुणावर चार पाच जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला.

    या हल्ल्यात करण शिवतरे ( वय २६ वर्ष, रा.गणेश चौक, आंबेगाव पठार) गंभीर जखमी झाले आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ९.३० वाजता क्रांती सूर्य महात्मा फुले (तिन हत्ती) चौकाकडून के. के. मार्केटकडे जाणाऱ्या मार्गावर संभाजीनगर परिसरातील गल्लीत करण याच्यावर हल्ला झाला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले.

    दरम्यान, जखमी तरुणाला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *