• February 6, 2025
  • No Comment

धक्कादायक! मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने पिंपरीत युवकाचा खून; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

धक्कादायक! मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने पिंपरीत युवकाचा खून; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या

    पिंपरी-चिंचवड: पिंपरीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्याने भैय्या गमन राठोड (वय ३३, रा. पाटीलनगर, चिखली. मूळ रा. जळगाव) या तरूणाचा खून करण्यात आला होता.

    याप्रकरणी सुरज हनुमंत इंगळे (वय २९), मेहुल कैलास गायकवाड (वय २८), अजय अशोक कांबळे (वय २४, रा. पाटीलनगर, चिखली) यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटीलनगर चिखली येथे वन विभागाच्या जागेत भैय्या गमन राठोड (वय ३३, रा. पाटीलनगर, चिखली. मूळ रा. जळगाव) याचा रविवारी खून झाला होता. त्यानंतर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी परिसरातील अनेक ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे तपासले. त्यानंतर आरोपींना चिखली मधून ताब्यात घेतले आहे. तपासात मद्यपान करण्यासाठी पैसे न दिल्यामुळे खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

    भैय्या गमन राठोड (वय ३३, रा. पाटीलनगर, चिखली. मूळ रा. जळगाव) हा मागच्या तीन महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात कामासाठी आला होता. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरनी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *