• February 7, 2025
  • No Comment

चालत जाणाऱ्या तरुणाच्या डोक्यात घातला घाव, विमाननगर मधील घटना

चालत जाणाऱ्या तरुणाच्या डोक्यात घातला घाव, विमाननगर मधील घटना

    पुणे: रस्त्याने चालत जाणाऱ्या तरुणाला अडवून लुटण्याचा प्रयत्न केला, तरुणाने विरोध केल्यावर लोखंडी वस्तुने त्याच्या डोक्यात घाव घालून जखमी केल्याचा प्रकार विमाननगर येथे घडला आहे.

    प्रकाश दीपक थापा (वय ३०, रा. यशोदा नंदन सोसायटी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पाच फेब्रुवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विमाननगर परिसरातील यशोदानंदन सोसायटी येथे सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतो आणि तेथेच राहायला आहे. कामानिमित्त तरुण सोसायटीच्या बाहेर गेला होता. त्यावेळी अज्ञात तरुणाने त्याला अडवले आणि “तुझ्याकडे जे जे आहे ते मला काढून दे,” असे बजावले. अज्ञात व्यक्ती तरुणाच्या खिसे तपासात असताना तरुणाने त्यास विरोध केला. त्या व्यक्तीने तरुणाच्या डोक्यामध्ये लोखंडी जड वस्तुने मारले. त्याने तरुणाला दुखापत केली. विमानतळ पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *