• February 7, 2025
  • No Comment

सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणारा चोरटा जेरबंद

सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणारा चोरटा जेरबंद

    पुणे : सकाळी मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेणार्‍या सराईत चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले आहे.

    राजू महादेव डेंगळे (वय २२, रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड) असे या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी महिला या ३० जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडल्या होत्या. त्रिमूर्ती चौकाचे पुढे प्रज्ञा वॉशिंग सेटर समोर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन्याची चेन हिसका मारुन चोरुन नेली होती.

    गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी तपास पथकाला आरोपींचा तात्काळ शोध घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तपास पथकाचे अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे हे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरुन आरोपींचा शोध घेत असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राजू डेंगळे याने केल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा शोध घेऊन कात्रज कोंढवा रोडवर त्याला पकडले. त्याच्याकडून चोरलेली १ तोळे वजनाची सोन्याची चैन जप्त केली आहे. त्याने आणखी गुन्हे केले आहेत का याचा तपास सुरु आहे.

    ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, गुन्हे निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश् मोकाशी, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, चेतन गोरे, महेश बारवकर, सचिन सरपाले, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांच्या पथकाने केली आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *