• February 17, 2025
  • No Comment

हरवलेले ४५६ मोबाईल नागरिकांना परत; पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

हरवलेले ४५६ मोबाईल नागरिकांना परत; पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    पुणे: मोबाइल फोन हरवल्यावर नागरिकांच्या मनात रुखरुख लागून असते. शहर पोलिसांनी सी.ई.आय.आर. पोर्टलच्या मदतीने हरविलेले किंवा गहाळ झालेले ४५६ मोबाईल शोधून नागरिकांना परत दिले. पोलिसांच्या या कारवाईमुळे हरवलेले फोन परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेची प्रशंसा केली आहे.

    पुणे शहर पोलिसांनी नागरिकांसाठी त्यांच्या हरवलेल्या किंवा गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ‘लॉस्ट अँड फाउंड’ पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलद्वारे हरवलेल्या फोनच्या तक्रारी नोंदवता येतात. तसेच ‘प्रॉपर्टी मिसिंग’चा ऑनलाईन दाखला देखील नागरिकांना मिळतो. नागरिकांना त्यांचा आधारकार्डसह सी.ई.आय.आर. केंद्रीय पोर्टलवर तक्रार नोंदवावी लागते. त्यानंतर सी.ई.आय.आर. पोर्टलवर प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार हरवलेल्या मोबाईल फोनचे आयएमईआय क्रमांक ट्रॅक करून, तांत्रिक विश्लेषण करून हरवलेल्या मोबाइल फोनमध्ये सध्या सुरू असलेल्या मोबाइल क्रमांकाचा शोध घेतला जातो. ही माहिती सी.ई.आय.आर. पोर्टलवरून पोलिसांना मिळते.

    शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा, संगणक शाखा आणि सायबर पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अंमलदार यांची सहा संयुक्त पथके तयार करण्यात आली. सी.ई.आय.आर. पोर्टलवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे हरवलेल्या मोबाईलच्या शोधासाठी तांत्रिक विश्लेषण केले. गेल्या एका महिन्याच्या कारवाईत, एकूण २३०० तक्रारींपैकी ४५६ हरवलेले मोबाईल शोधण्यात आले. पुणे शहराबाहेर ट्रेस झालेले मोबाईल शोधण्याचे काम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    पोलीस आयुक्तांच्या हस्ते मोबाईल परत वितरण:

    १४ फेब्रुवारी रोजी पुणे पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉल येथे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हरवलेले मोबाईल संबंधित नागरिकांना परत देण्यात आले. मोबाईल मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला. हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. पोलिसांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

    सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त मच्छींद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, टीम १ चे राहूल शिंदे, किरण जमदाडे, संदिप कोळगे, टीम २ चे प्रमोद टिळेकर, विशाल इथापे, मनोज सांगळे, टीम ३ चे चेतन चव्हाण, नितीन जगदाळे, टीम ४ चे राजेंद्र पुनेकर, लटू सुर्यवंशी, समीर पिनाणे, टीम ५ चे इश्वर आंधळे, सुनयना मोरे, लोकेश्वरी चुटके, टीम ६ चे किरण गायकवाड, सचिन शिंदे, कल्याणी कोळेकर तसेच सुषमा तरंगे, दिनेश मरकड, अमर बनसोडे, आदनान शेख या सायबर पोलीस ठाणे, संगणक शाखा व गुन्हे शाखेकडील पोलीस पथकाने यशस्वी रित्या पार पाडली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *