• February 17, 2025
  • No Comment

घरगुती भांडणात ढकलून दिल्याने बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यु; चुलत भाऊ अटक

घरगुती भांडणात ढकलून दिल्याने बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यु; चुलत भाऊ अटक

    नांदेड सिटी: घरगुती भांडणात अंगावर धावून आल्याने ढकलून दिल्याने बाल्कनीतून पडून एका तरुणाचा मृत्यु झाला. पण ज्याने ढकलून दिले तो आणि हा प्रकार पाहणारा दोघांनी कोणाला काहीही सांगितले नाही.

    दुसर्‍या दिवशी सकाळी जेव्हा हा प्रकार समोर आला. त्यानंतर नांदेड सिटी पोलिसांनी याच्या मागील कारण शोधून काढून चुलत भावाला अटक केली आहे.

    राजु भुरेलाल देशमुख (रा. कपील अपार्टमेंट, मतेनगर, धायरीगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अमर किसन देशमुख (वय ३५, रा. कपील अपार्टमेंट, मतेनगर, धायरीगाव) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मोहपत हरीराम साहारे (वय ३६, रा. धायरीगाव) यांनी नांदेडसिटी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेआठ वाजता घडली होती.

     

    याबाबत नांदेडसिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी सांगितले की, राजु देशमुख व त्यांचा चुलत भाऊ अमर देशमुख व इतर दोघे जण हे मुळचे मध्यप्रदेशातील आहे. ते एका सोनपापडीच्या कारखान्यात काम करतात. कपील अपार्टमेंटमध्ये एकत्र राहतात. राजू व अमर यांच्यामध्ये त्यांच्या गावाकडील पत्नीबाबत बोलण्यावरुन भांडणे झाली. तेव्हा अमर हा मारण्यासाठी राजूच्या अंगावर धावला. त्यावेळी राजू याने अमर याला ढकलून दिल्याने तो बाल्कनीतून खाली पडला. खाली पडलेल्या अमर देशमुख याला कोणतीही मदत न करता राजू हा घरात गप्प बसून राहिला. हा सर्व प्रकार साहारे याने पाहिला असतानाही तो कोणाला काहीही न सांगता तेथून निघून गेला होता. दुसर्‍या दिवशी सकाळी अमर देशमुख याचा मृत्यु झाल्याचे समजले. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला. तेव्हा राजू देशमुख याने घडलेला प्रकार सांगितले. मृत्युस कारणीभूत ठरल्याबद्दल राजू देशमुख याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *