• February 17, 2025
  • No Comment

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने धुणीभांडी करणाऱ्या वयोवृद्ध महिलेला नदीपात्रात लुटले; चार तासांत आरोपी गजाआड

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने धुणीभांडी करणाऱ्या वयोवृद्ध महिलेला नदीपात्रात लुटले; चार तासांत आरोपी गजाआड

    पुणे: धुणीभांडी करणाऱ्या वयोवृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मारहाण करण्याची धमकी देवून जबरदस्तीने तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी चार तासांत बेड्या ठोकल्या.

    डेक्कन पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने ही कामगिरी केली.

    अक्षय अनिरुद्ध ओक (वय २७, रा. शनिवार पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका ६५ वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली होती.

    पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, तक्रारदर महिला दत्तवाडी परिसरात राहण्यास आहे. शनिवारी (१५ फेब्रुवारी) आरोपी अक्षय ओक याने महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटले. डेक्कन परिसरातील नदीपात्र वीटभट्टीजवळ महिलेला मारहाण करण्याची धमकी देवून जबरदस्तीने तिच्या गळ्यातील सोनसाखळी त्याने हिसकावून नेली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. डेक्कन पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल केला.

     

    गुन्हा दाखल होताच पोलिसांचे तपास पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांनी केली. तसेच गुप्त बातमीदाराद्वारे आरोपीचे नाव तसेच इतर उपयुक्त माहिती पोलिसांनी मिळवली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपी अक्षय ओक याला शनिवार पेठेतून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला डेक्कन पोलीस ठाण्यात आणले.

     

    आरोपी अक्षय ओक हा शनिवार पेठेत राहण्यास आहे. त्याचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याच्याकडून एक लाखाची सोनसाखळी तसेच २० हजारांची दुचाकी असा एक लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले करत आहेत.

     

    सदरची कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, उपायुक्त संदिपसिंह गिल्ल, सहायक आयुक्त साईनाथ ठोंबरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर, महेश शिरसाठ, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, रोहित मिरजे, नागनाथ म्हस्के यांनी केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *