• February 17, 2025
  • No Comment

लक्ष्मीनगर पोलीस चौकी शेजारील वाहनांची तोडफोड करणार्‍या गुन्हेगाराची येरवडा पोलिसांनी काढली धिंड

लक्ष्मीनगर पोलीस चौकी शेजारील वाहनांची तोडफोड करणार्‍या गुन्हेगाराची येरवडा पोलिसांनी काढली धिंड

    येरवडा: येरवडा येथील लक्ष्मीनगर पोलीस चौकी शेजारील १२ रिक्षा व २ मोटरसायकलची तोडफोड करणार्‍या गुन्हेगाराला पकडून येरवडा पोलिसांनी जेथे तोडफोड केली, त्या परिसरात धिंड काढली.

    सयाजी संभाजी डोलारे (वय २३, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. तोडफोडीची ही घटना ६ फेब्रुवारी रोजी रात्री २ वाजता घडली होती.

    याबाबत अबूबकर रजाक पिरजाते (वय ३१, रा. लक्ष्मीननगर पोलीस चौकी शेजारी, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिरजाते व इतरांच्या रिक्षा पार्क केलेल्या असताना रात्री २ वाजता सयाजी डोलारे याने परिसरात मोठमोठ्याने आरडा ओरडा करीत शिवीगाळ करुन दहशत माजविली. त्याच्याकडील धारदार हत्याराने परिसरातील १२ रिक्षांच्या काचा फोडल्या. २ दुचाकीवर वार करुन नुकसान केले. एक जेसीबीची काच फोडली. फिर्यादी यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यावर वार करुन जखमी केले होते.

    या घटनेनंतर सयाजी डोलारे हा फरार झाला होता. येरवडा पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली. त्यानंतर रात्री लक्ष्मीनगर परिसरात त्यांची धिंड काढली. जेथे जेथे गाड्यांच्या काचा फोडून दहशत माजविली होती. त्या परिसरात हातात दोरखंड बांधून त्याला फिरविण्यात आले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *