• March 4, 2025
  • No Comment

औरंगजेबाचा फोटो ठेवणाऱ्या इसमाची येरवडा कारागृहात रवानगी ; बारामती पोलिसांची धडक कारवाई

औरंगजेबाचा फोटो ठेवणाऱ्या इसमाची येरवडा कारागृहात रवानगी ; बारामती पोलिसांची धडक कारवाई

    बारामती: बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. बारामती शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी गोपनीय सूत्रांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, एका व्यक्तीने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवत धार्मिक भावना भडकवणारा मजकूर पोस्ट केला आहे. सदर माहिती मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले.

     

    त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, वादग्रस्त स्टेटस आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर आढळून आला. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 127 नुसार प्रस्ताव तयार करून अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार यांच्यासमोर सादर करण्यात आला.

    सुनावणीदरम्यान आरोपीच्या कृत्यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाल्याने, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. बारामती शहर पोलीस सोशल मीडियावर सतत नजर ठेवून असून, कोणत्याही धर्माविरोधात चिथावणीखोर मजकूर पोस्ट करणाऱ्या इसमांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *