• March 5, 2025
  • No Comment

बेकायदा सावकारी करणाऱ्यांच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; वानवडी पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

बेकायदा सावकारी करणाऱ्यांच्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या; वानवडी पोलिसांकडून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: बेकायदा सावकारी करणाऱ्या दोघांच्या त्रासामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घोरपडीतील ढोबरवाडीत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन वानवडी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    सचिन कट्टीमणी (रा. ढोबरवाडी, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याबाबत सचिन यांची आई येलक्का हनुमंता कट्टीमणी (वय ६१, रा. ढोबरवाडी, घोरपडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्टिव्हन नेगल, विजय इंगळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यांनी आरोपी स्टिव्हन आणि विजय यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाने घेतलेले पैसे, तसेच व्याजाची रक्कम परत करण्यावरुन आरोपींनी सचिन यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून वेळोवेळी धमकी दिली. धमकीमुळे सचिन नैराश्यात होते. १ मार्च रोजी सचिन यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. सचिन यांची आई येलक्का यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. चौकशीत सचिन यांनी आरोपींनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक रियाज सय्यद पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *