• March 5, 2025
  • No Comment

वाढदिवस साजरा करताना सत्तुर आणि गावठी कट्टा बाळगणारा १९ वर्षीय तरुण गजाआड

वाढदिवस साजरा करताना सत्तुर आणि गावठी कट्टा बाळगणारा १९ वर्षीय तरुण गजाआड

    पुणे: सार्वजनीक ठिकाणी वाढदिवस साजरा करताना सत्तुर आणि गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणास अटक करण्यात आली. तर त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले. वाढदिवसाचे चित्रीकरण समाजमाध्यमावर टाकण्याच्या हेतूने शस्त्र जवळ बाळगण्यात आले होते.

    अनिकेत दिपक गायकवाड (१९ रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक तरुणाचे नाव आहे. त्याच्याविरुध्द खडक पोलीस ठाण्यात आर्म ॲक्टनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार हर्षल दुडम व अंमलदार कृष्णा गायकवाड यांना खबर मिळाली की, घोरपडे पेठ येथील पीएमसी कॉलनीत अनिकेत गायकवाड हा पिस्तुल व लोखंडी सत्तूर घेऊन आला आहे. त्याचा वाढदिवस असून तो केक कापण्यासाठी उभा आहे. त्यानूसार खडक पोलिसांनी काही पथके बनवून संबंधीत ठिकाणी सापळा रचला.

    तो त्याच्या साथीदारांसह केक कापण्याच्या तयारीत असतानाच त्याची पोलिसांशी नजरा नजर झाली. यानंतर तो साथीदारांसह पळून जात असताना पथकाने त्याला अल्पवयीन साथीदारासह पाठलाग करुन पकडले. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांना थोडी दुखापतही झाली. त्याची अगंझडती घेतली असता पॅन्टमध्ये एक पिस्तूल व दुचाकीत सत्तूर सापडला. त्याचे वडिल ठेकेदार असून त्याचे शिक्षण आठवी पर्यंत झाले आहे. त्याने पिस्तूल कोठून मिळवले याचा शोध घेण्यात येत आहे.

    सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे , पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, कृष्णा गायकवाड, विश्वजीत गोरे, अक्षयकुमार वाबळे, योगेश चंदेल, मयूर काळे, शोएब शेख यांचे पथकाने केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *