• March 8, 2025
  • No Comment

आर्थिक व्यवहारातून अपहरण झालेल्या एकाची हडपसर पोलिसांकडून अवघ्या सहा तासांत सुटका

आर्थिक व्यवहारातून अपहरण झालेल्या एकाची हडपसर पोलिसांकडून अवघ्या सहा तासांत सुटका

    हडपसर: आर्थिक व्यवहारातून अपहरण झालेल्या एकाची हडपसर पोलिसांनी सहा तासांत सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. प्राजस दीपक पंडित (वय २५, रा. त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ परिसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिलाल विश्वकर्मा हे फर्निचर तयार करतात.

    गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चार ते पाच जण विश्वकर्मा यांच्या घरी आले. फर्निचरचे काम करायचे असल्याचे सांगून हरिलाल यांना घरातून घेऊन गेले. त्यानंतर मध्यरात्री विश्वकर्मा यांचा मुलगा योगेश याने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा वडील घाबरलेले होते, अशी माहिती योगेशने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्याानंतर या घटनेची माहिती हडपसर पोलिसांना कळविण्यात आली.

    हडपसर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी खेड शिवापूर, शिंदेवाडी, जांभूळवाडी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले आणि पथकाने अपहरण करणाऱ्या आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.

    आरोपी कात्रज घाटात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून आरोपी प्राजसला पकडले. त्याच्याबरोबर हरिलाल विश्वकर्मा होते. चौकशीत प्राजस आणि साथीदारांनी आर्थिक व्यवहारातून हरिलाल यांचे मांजरी परिसरातून अपहरण केल्याची कबुली दिली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *