- March 8, 2025
- No Comment
लाडक्या बहिण योजना, मोठी अपडेट, 2 महिन्यांचे पैसे एकदम मिळणार ‘या’ महिला ठरतील अपात्र
राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा हप्त कधी मिळणार यासंदर्भात अनेक बहिणींना प्रतिक्षा लागलेली आहे. यासंदर्भात दोन दिवसांआधीच राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पैसे कधी मिळणार याचे संकेत दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता निकषांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. “या योजनेच्या अटी व शर्तींनुसार लाभार्थ्यांची पात्रता आणि अपात्रता ठरवण्यात आली आहे. याच निकषांनुसार अर्जांची छाननी केली जात आहे. कोणत्याही योजनेतील अर्जांची छाननी ही निरंतर प्रक्रिया असते. त्यानुसार निकषांची पूर्तता न करणाऱ्या लाभार्थी महिलांना या योजनेचा आर्थिक लाभ न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.
किती महिलांना मिळणार हप्ता, किती अपात्र?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील 2.52 कोटी पात्र महिलांना 8 मार्चपर्यंत जानेवारी आणि फेब्रुवारीचे प्रलंबित हप्ते मिळतील. या योजनेअंतर्गत 2 कोटी 63 लाख महिलांनी अर्ज केले होते, त्यापैकी 2 कोटी 52 लाख महिला सध्या पात्र आहेत. म्हणजेच जवळपास 11 लाख महिलांना हप्ता मिळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.
कुणाला मिळणार नाही हप्ता?
“ही योजना 21 ते 65 वयोगटातील महिलांना लागू आहे. त्यामुळे दर महिन्याला 65 वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलांना अपात्र घोषित केले जाते. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत असते. सध्या, वयोमर्यादा ओलांडल्यानंतर सुमारे 1 लाख 20 हजार महिलांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.