- March 8, 2025
- No Comment
वाघोली परिसरात वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न, दोन अल्पवयीन मुल पोलिसांच्या ताब्यात
वाघोली: वाघोली परिसरात गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या गाड्यांची तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आवाहन वाघोली पोलिसांसमोर असणार आहे.
वाघोलीतील एस.टी. कॉलनी परिसरात लोखंडी हत्याराने गाड्यांची तोडफोड करण्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा दगडाने वाहनांच्या काचा फोडण्याचा प्रकार शुक्रवारी समोर आला असून दुबे नगर, आव्हाळवाडी रोड, गणेश नगर, एसटी कॉलनी परिसरामध्ये जवळपास 10 हून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलांनी सदरचा प्रकार करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला असल्याचे तोडफोड झालेल्या मालकांनी सांगितले. दुबे नगर परिसरात स्ट्रीट लाईट व रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने गाड्यांची तोडफोड केल्याने नागरिकांनी सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. वाघोली पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे.