• March 9, 2025
  • No Comment

2 लाख रुपयांची खंडणी न दिल्याच्या रागातून तरुणास मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

2 लाख रुपयांची खंडणी न दिल्याच्या रागातून तरुणास मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: सराईत गुन्हेगाराला सोडविण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी न दिल्याच्या रागातून १० जणांच्या टोळक्याने तरुणाच्या कार्यालयात घुसून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

    त्यानंतर घाबरलेला तरुण आपल्या भावासोबत तक्रार देण्यासाठी चालला असता पुन्हा टोळक्याने रस्त्यात अडवून हवेत कोयता फिरवत दहशत निर्माण केली. काळेवाडी येथील आदर्शनगरमध्ये ही घटना घडली.

    सचिन बाबाजी काळे (वय-३८, रा. आदर्शनगर, काळेवाडी) यांनी शुक्रवारी (दि.७) याबाबत काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अमोल खेडेकर, आदित्य चोथे, गणेश बोरुडे, शुभम खेडेकर, बंड्या सगर, संतोष चव्हाण (सर्व रा- काळेवाडी) आणि त्यांचे चार ते पाच साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० दिवसांपूर्वी अमोल खेडेकर याने फिर्यादी सचिन काळे यांच्याकडे डी भाई (प्रशांत दिघे) याला सोडविण्यासाठी २ लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. ते पैसे न दिल्याने त्याचा राग मनात धरून खेडेकर, चोथे, बोरुडे यांनी आपसात संगनमत करून गुरुवारी (दि.६) सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी सचिन काळे यांच्या कार्यालयामध्ये घुसले. फिर्यादी सचिन यांचा भाऊ राहुल काळे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने अमोल खेडेकर याने आपल्या हातातील बाटली फेकून मारली.

    याबाबत सायंकाळी ७ वाजता फिर्यादी तक्रार देण्यासाठी जात असताना संशयितांनी आरडाओरडा, शिवीगाळ केली. बंड्या सगर याने हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. तसेच संशयितांनी फिर्यादी सचिन, भाऊ राहुल, शुभम काळे, निहाल नदाफ व उमेश जोगदंड यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली व बंड्या सगर याने कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच संघटित गुन्हेगारी करून संशयितांनी दहशत निर्माण केली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *