• March 9, 2025
  • No Comment

कोथरूडमध्ये दुचाकीस्वारासह दोघांना बेदम मारहाण, आरोपी अटक साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल

कोथरूडमध्ये दुचाकीस्वारासह दोघांना बेदम मारहाण, आरोपी अटक साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: किरकोळ वादातून रिक्षाचालक आणि साथीदारांनी दुचाकीस्वार तरुणासह मित्राला बेदम मारहाण केल्याची घटना कोथरूड भागात घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून, साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अक्षय राजन लोणकर (वय २९, रा. विठाई पार्क सोसायटी, कसबा पेठ), ललित आढाव (वय २४, रा. कसबा पेठ) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रिक्षाचालक सचिन महादेव मिसाळ (वय ४८ ,रा. कोथरूड) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेला साथीदार सम्राट विजय सणस (वय २७, रा. कानिफनाथ सोसायटी, कोथरूड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत लोणकर याने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

     

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणकर आणि त्याचा मित्र आढाव हे शुक्रवारी (७ मार्च) कोथरूड भागातील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभासाठी गेले होते. दुपारी साडेबााराच्या सुमारास दोघे जण विवाह समारंभ आटोपून निघाले होते. एमआयटी महाविद्यालयाकडून पौड रस्त्याकडे वळण घेत असातना दुचाकीस्वार लोणकर आणि रिक्षाचालक मिसाळ समोरासमोर आले. मिसाळ आणि लोणकर यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला.

    त्यानंतर मिसाळने दोघांना शिवीगाळ केली. साथीदार सणस याला बोलावून घेतले. लोणकर आणि आढाव यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मिसाळने त्याच्याकडील चावी डोक्यात मारल्याने आढाव आणि लोणकर जखमी झाले. त्यानंतर मिसाळ आणि साथीदार पसार झाला. जखमी अवस्थेतील लोणकर आणि आढाव यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करुन रिक्षाचालक मिसाळ याला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने, सहायक निरीक्षक चेतन धनावडे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक अडागळे तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *