- March 9, 2025
- No Comment
पुण्यातील अहुजा कुटुंबाची कुंडली आली समोर, खंडणीचे गुन्हे; जेलवारीही केली, अवैध व्यवसायात सहभाग
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाने रस्त्याच्या मधोमध आपली आलिशान कार थांबवली आणि सार्वजनिक ठिकाणी लघूशंका केली. त्यानंतर भररस्त्यात अश्लील वर्तन केल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्येश निबजीया आणि गौरव मनोज अहुजा अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. भाग्येश निबजीया हा शेजारी बसला होता. तर गौरव मनोज अहुजा हा गाडी चालवत होता. गौरव मनोज अहुजाने सार्वजनिक ठिकाणी लघूशंका केल्याचे दिसून आले होते. त्यानंतर लज्जास्पद कृत्यही केले होते. यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या दोघांविरोधीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या शोधासाठी पथक नेमण्यात आले आहे. या दोघांचाही तपास सुरू आहे. यात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, दोन आरोपींच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता, मुंबई पोलीस अॕक्ट आणि मोटर परिवहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर आधीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचा शोध सुरू आहे. यानंतर आरोपींची पार्श्वभूमीही सांगितली आहे. यात आरोपींवर आधीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
आरोपी गौरव अहुजा आणि वडील मनोज अहुजा यांच्यावर क्रिकेट बेटींग तसेच खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याआधी ही त्यांनी जेलवारी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. लॉटरी हा अहुजा कुटुंबाचा पिढीजात व्यवसाय आहे. सध्या हे कुटुंब हॉटेल व्यवसायातही उतरले आहे. त्यांचे पुण्यात एक हॉटेल आहे. तर दुसरीकडे क्रिकेट बेटींगच्या अवैध व्यवसायात ही अहुजांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे.
यानंतर पुणे पोलिसांनी गौरव अहुजाचे वडील मनोज अहुजा यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी या प्रकरणी खंत व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मनोज अहुजा यांच्या हॉटेलबाहेर आंदोलन करण्यात आले आहे. यात गौरवचा पोस्टर्स जाळण्यात आले आहेत. महिला कार्यकर्त्यांनी हॉटेल बाहेर आंदोलन केले आहे. तसेच कारवाईची मागणी केली आहे.