- March 9, 2025
- No Comment
पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला साताऱ्यात ठोकल्या बेड्या
पुणे: पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा याला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. ८ मार्च रोजी सकाळी भर चौकात गौरव अहुजा याने अश्लील कृत्य केले होते, त्यानंतर एकच संतापाची लाट उसळली होती.
त्याला सातारा पोलिसांनी अटक केली असून पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलेय. गौरव आहूजा बरोबर असलेला त्याचा मित्र भाग्यश ओसवाला याला शनिवारी येरवडा पोलिसांनी अटक केली. बीएमडब्ल्यू मध्ये बसून तो दारू पीत होता, त्यावेळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
पुण्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव अहुजा याचा पोलिसांकडून शनिवारी शोध घेतला जात होता. त्यावेळी त्याचा एक व्हडीओ समोर आला, त्यामध्ये त्याने जाहीर माफी मागितली होती. माझ्याकडून पब्लिकमध्ये जे कृत्य झालं होतं, ते खूप चुकीचं होतं. संपूर्ण जनता, पोलीस डिपार्टमेंट आणि शिंदे साहेबांची मी माफी मागतो.. मला एक संधी द्या..माझ्या कुठल्याही फॅमिली मेंबरला त्रास देऊ नका. मी सरेंडर होणार आहे, असे त्याने व्हिडीओत म्हटलेय.