- March 11, 2025
- No Comment
इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट समितीवर वाळुंजकर यांची नियुक्ती
पिंपरी: कौशल्य विकास, नाविन्यता व रोजगार विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेवरती मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार सदस्यांची नियुक्ती करण्यात आली, त्यामध्ये पुणे विभाग स्तरावर गौरव वाळुंजकर यांची वर्णी लागली आहे. गौरव वाळुंजकर हे अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेचे पूर्व महानगर मंत्री, महाराष्ट्र कार्य समिती सदस्य अश्या महत्वाच्या जबाबदारी पार पाडलेले युवा कार्यकर्ते आहेत.विध्यार्थीदशेत शेकडो विध्यार्थीसाठी यशस्वी आंदोलन, त्यांनी केलेल्या काम, हुशार व गरजू विध्यार्थीना शिष्यवृत्ती, तसेच विध्यार्थी सहयोग संस्थेचे कामकाज, शैक्षणिक व सामाजिक कार्यांचे आयोजन याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे.
अत्याधुनिक औदयोगिककरण होत असताना कोर्सेस निर्मिती करणे, विध्यार्थ्यांना कौशल्य पूर्ण शिक्षण, नवीन इंक्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट व्हावे, यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
विध्यार्थ्यांच्या अडचणी शासन दरबारी मांडणार !
वाळुंजकर म्हणाले की, संस्थेचा दर्जा उंचावण्याचे काम येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहे. स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम राबवणार आहे. विध्यार्थ्यांच्या अडचणी शासन दरबारी मांडणार आहे. अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, संस्थेमधील
शिक्षकांच्या अडचणी शासन दरबारी मांडण्यात येणार आहे, संस्था आणि प्रशासन याचा दुवा म्हणून काम करणार असल्याची गौरव वाळुंजकर यांनी निवडीनंतर सांगितले आहे…