- March 15, 2025
- No Comment
कात्रज-संतोषनगर मुख्य रस्त्यावरून काढली गुंडांची धिंड

कात्रज: आंबेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात वाहनांची तोडफोड, राडा, दंगा, मारामाऱ्या करून दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. कात्रज-संतोषनगर मुख्य रस्त्यावरून ऐन होळीच्या दिवशी त्यांची धिंड काढली.
रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या बेधडक कारवाईबाबत समाधान व्यक्त केले.
२० ते २५ वयोगटातील सराईत गुन्हेगारांकडून परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवत दहशत माजवण्याच्या दृष्टीने गुन्हे केले जात होते. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसविण्याच्या दृष्टीने कात्रज, संतोषनगर, सच्चाईमाता चौक, भगवा चौक, हनुमाननगर, शनीनगर, जांभूळवाडी रस्ता, पाण्याची टाकी चौक परिसरातून पायी धिंड काढण्यात आली.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे, प्रियंका गोरे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, रातीकांत कोळी, सुरेश शिंदे, लक्ष्मण डोईफोडे यांच्यासह आंबेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.