- November 2, 2025
- No Comment
कोंढव्यातील गणेश काळे हत्या प्रकरण:पोलिसांकडून चार आरोपींना अटक, दोन अल्पवयीनांचा समावेश
पुणे : पुण्यात गँगवॉरमधुन कोंढवा भागात गणेश काळे या रिक्षाचलकाची हत्या करण्यात आली. त्याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले आणि त्याची हत्या केली गेली. चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अमन मेहमबुब शेख, (22) अरबाज पटेल, आणि दोन अल्पवयीन आरोपींना गजाआड केले आहे. शिवापूर परिसरातून चार आरोपींना कोंढवा डी बी पथकाने अटक केली आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाले होते.
पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले दोन पिस्तूल आणि दोन हत्यारे जप्त केली आहेत. चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील एक आरोपी हा ज्यावेळी कृष्णा आंदेकरला मेडिकलला आणले होते त्यावेळी त्याला भेटायला गेला होता.