• November 2, 2025
  • No Comment

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांच्या ५२७ रिक्त जागांसाठी भरती जाहीर

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदांच्या ५२७ रिक्त जागांसाठी भरती जाहीर

    तुम्ही पोलीस होण्याचं स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) साठी भरतीची घोषणा केलीय आहे. जवळपास ५२७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ ऑक्टोबर रोजी सुरू झाली आहे. उमेदवारांना ३० नोव्हेंबरपर्यंत या नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे.

    या भरती प्रक्रियेबाबत पोलीस उपायुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील म्हणाले, ही भरती मोहीम नवी मुंबई पोलिस दलाची कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. शहरी क्षेत्राची जलद वाढ आणि येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे, कार्यक्षम कायद्याच्या अंमलबजावणीची गरज वाढत आहे. नवीन भरतीमुळे वाहतूक व्यवस्थापन, गस्त घालणारे युनिट्स आणि विशेष ऑपरेशन्ससाठी मनुष्यबळ वाढेल,” असे ते म्हणाले.

    रिक्त पद कोणती आणि पात्रता काय

    एकूण रिक्त पदांपैकी ४४५ पदे पोलिस कॉन्स्टेबलसाठी

    असणार आहेत. तर ८२ पदे पोलीस कॉन्स्टेबल (ड्रायव्हर्स)

    साठी असतील. जो उमेदवार नोकरीसाठी अर्ज करणार आहे,

    त्याच्याकडे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या उच्च माध्यमिक (इयत्ता

    १२ वी) परीक्षा किंवा कोणत्याही सरकार-मान्यताप्राप्त

    समकक्ष परीक्षा उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. NIOS वरिष्ठ

    माध्यमिक आणि CBSE इयत्ता 12वीच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले

    उमेदवार देखील या नोकरीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

    वयाची पात्रता काय?

    पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी सामान्य श्रेणीतील

    उमेदवारांसाठी वयोमर्यादा १८ ते २८ वर्षे असणार आहे. तर

    राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयाची १८ ते ३३ वर्षे आहे.

    पोलीस कॉन्स्टेबल चालक पदासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची मर्यादा १९ ते २३ वर्ष असेल. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची मर्यादा १९ ते ३३ वर्ष असणार आहे.

    निवड प्रक्रिया आणि अर्ज शुल्क निवड प्रक्रियेत शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, चारित्र्य पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीचा समावेश असेन. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ४५० रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३५० रुपये ठेवण्यात आलीय.

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *