• November 3, 2025
  • No Comment

बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकरच्या सांगण्यावरुन गणेश काळेचा खून

बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकरच्या सांगण्यावरुन गणेश काळेचा खून

    पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनातील आरोपीचा भाऊ गणेश किसन काळे याचा खुन केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांसह चौघांना ताब्यात घेतले आहे. गँगस्टर बंडु आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्या सांगण्यावरुन हा खुन करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    कृष्णा आंदेकर (वय २८), बंडु आंदेकर (वय ६९), अमीर खान (वय २५), मयुर वाघमारे (वय २३), स्वराज वाडेकर (वय २५), अमन मेहबुब शेख (वय २३, रा. काकडे वस्ती, कोंढवा), अरबाज अहमद पटेल (वय २४, रा. काकडे वस्ती, कोंढवा) आणि दोन अल्पवयीन अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत

    बंंडु आंदेकरसह प्रमुख आरोपी हे येरवडा कारागृहात आहेत. पोलिसांनी अरबाज पटेल आणि अमन शेख यांना अटक केली आहे. तसेच दोघा अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे. अमन शेख आणि अरबाज पटेल हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहे. अरबाज पटेल याला काही वर्षांपूर्वी तडीपार करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी त्याला एक वर्षासाठी अकोला कारागृहात एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता. त्याची मुदत संपल्यानंतर तो पुन्हा कोंढव्यात आला होता.

     

    गेल्या वर्षी मार्च २०२४ मध्ये तळेगाव दाभाडे येथे चार ठिकाणी गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अमन मेहबुब शेख व समर्थ तोरणे यांच्याकडून ३ पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. अन्य दोन अल्पवयीन मुलांवरही यापूर्वी काही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

    याबाबत गणेश काळे यांचे वडिल किसन धोंडिबा काळे (वय ५१, रा. शिवकृपा बिल्डिंग, येवलेवाडी, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    गणेश किसन काळे (वय ३०, रा. शिवकृपा बिल्डिंग, येवलेवाडी, कोंढवा) असे खुन झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनामध्ये गणेश काळे याचा भाऊ समीर काळे हा आरोपी असून सध्या तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. गणेश काळे हा रिक्षाचालक आहे. नेहमीप्रमाणे तो खडी मशीन येथील भारत पेट्रोलपंपाजवळ रिक्षामध्ये थांबला होता. त्यावेळी वनराज आंदेकर याच्या गुन्हेगारी टोळीतील साथीदार कृष्णा आंदेकर, बंडु आंदेकर, अमीर खान, मयुर वाघमारे व स्वराज वाडेकर यांच्या सांगण्यावरुन अमन शेख, अरबाज पटेल व दोन अल्पवयीन मुले असे चौघे जण दोन मोटारसायकलवरुन आले. त्यांनी गणेश काळे याच्यावर गोळीबार केला. कोयत्याने डोक्यात वार करुन त्याचा जागीच खुन केला.

    घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. शनिवारी दुपारी झालेल्या या खुनातील चारही आरोपींना काही तासात ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *