• November 3, 2025
  • No Comment

शिरूरमध्ये बिबट्याचा हल्ला:13 वर्षीय मुलाचा मृत्यू,

शिरूरमध्ये बिबट्याचा हल्ला:13 वर्षीय मुलाचा मृत्यू,

मलठण: पिंपरखेड येथे ऊसाच्या शेतात खेळत असलेल्या १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला फरपटत नेले. या हृदयद्रावक घटनेत रोहनचा दुर्दैवी मृत्यू झाला. वीस दिवसांत घडलेली ही तिसरी घटना असून, संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी फोडून पेटवून दिली, तसेच बेस कॅम्पचे ऑफिस जाळले. ठोस उपाययोजना होईपर्यंत शवविच्छेदन व अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. पंचतळे व रोडेवाडी फाटा येथे दीड ते दोन हजार ग्रामस्थांनी महामार्गावर रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारला.

रविवारी दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास रोहन घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत होता. हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. बराच वेळ मुलगा दिसत नसल्याने आई-वडिलांनी शेजाऱ्यांना बोलावून शोध सुरू केला. तरुणांनी आरडाओरड करत ऊसशेतात शोध घेतला असता रोहनचा मृतदेह आढळला.

या घटनेने परिसर हादरला. वीस दिवसांत तिसरी घटना घडल्याने ग्रामस्थांचा संताप उसळला. यापूर्वी दि. १२ शिवण्या बोंबे व दि. २२ भागुबाई जाधव यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. वनविभागाकडून ठोस बंदोबस्त न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी वनविभागाची गाडी फोडून-पलटी करून पेटवून दिली, तसेच बेस कॅम्पचे ऑफिस जाळले.

“दोन वेळा रास्तारोको केला, तरी वनविभाग व प्रशासनाला जाग येत नाही. अजून किती बळी गेल्यानंतर उपाययोजना होतील? निवडणुकांत मतदान बहिष्कार टाकू,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. रोहनचे पालक व ग्रामस्थांनी ठोस निर्णय व वनमंत्र्यांच्या उपाययोजनांशिवाय शवविच्छेदन व अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली.

पंचतळे (बेल्हा-जेजुरी महामार्ग) व रोडेवाडी फाटा (अष्टविनायक महामार्ग) येथे दीड ते दोन हजार ग्रामस्थांनी रास्तारोको करून वाहतूक ठप्प केली. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related post

प्रतिभा आणि तरुणाईचा जल्लोष ‘एमआयटी ज्युनियर कॉलेज यू’व्हाईब्स’ उत्साहात संपन्न

प्रतिभा आणि तरुणाईचा जल्लोष ‘एमआयटी ज्युनियर कॉलेज यू’व्हाईब्स’ उत्साहात…

लोणी काळभोर: माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव “यू-व्हाईब्स २०२५” मोठ्या उत्साहात पार पडला.…
पिस्टल  घेऊन फिरत असलेल्या सराईत गुन्हेगारासह तिघांना काळेपडळ पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ४ पिस्टल व ५ जिवंत काडतुसे जप्त

पिस्टल घेऊन फिरत असलेल्या सराईत गुन्हेगारासह तिघांना काळेपडळ पोलिसांनी…

पुणे : विरोधी टोळीतील लोक हल्ला करतील, या भितीने मध्यप्रदेशातून पिस्टल आणून ती घेऊन फिरत असलेल्या सराईत गुन्हेगारासह तिघांना काळेपडळ पोलिसांनी…
सिंहगड कॉलेजजवळील धक्कादायक घटना तरुणावर कोयत्याने वार, दगड डोक्यात घालून निर्घृण  हत्या

सिंहगड कॉलेजजवळील धक्कादायक घटना तरुणावर कोयत्याने वार, दगड डोक्यात…

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे आज सोमवारी दुपारी घडलेल्या एका थरकाप उडवणाऱ्या घटनेनं शहरातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा एकदा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *