- November 3, 2025
- No Comment
पुण्यात बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली एका कारचा भीषण अपघात दोन तरुणांचा जागीच मृत्यू
पुणे: बंडगार्डन मेट्रो स्टेशनखाली शनिवारी पहाटेच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारमधील दोन प्रवाशांचा म़त्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील सर्व तरुण हे चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून, हा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
कोरेगाव पार्क परिसरात रविवारी (2 नोव्हेंबर) मध्यरात्री बंड गार्डनर मेट्रो स्टेशनखाली झाला हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक काळ्या रंगाची पोलो कार ही मेट्रो स्टेशनखालील रस्त्याने पिंपरीच्या दिशेने वेगाने जात होती. त्यावेळी वाहनचालकाचे कार वरील नियंत्रण सुटले, त्यामुळे ती जोरात थेट जाऊन मेट्रो स्टेशनच्या खांबाला आदळली. या धडकेत कारचा चेंदामेंदा झाला असून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत