• November 5, 2025
  • No Comment

पुण्यात भरदिवसा खुनाचं सत्र सुरू! ३ दिवसांत दुसरा बळी; बाजीराव रोडवर मयंक खराडेची निर्घृण हत्या

पुण्यात भरदिवसा खुनाचं सत्र सुरू! ३ दिवसांत दुसरा बळी; बाजीराव रोडवर मयंक खराडेची निर्घृण हत्या

    पुणे : शहरातील गुन्हेगारी काही केल्या कमी होताना दिसत नसून वाढतच आहे, शहरात दिवसाढवळ्या हत्या, हत्येचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. त्यातच, आज पुन्हा एकदा पुण्यात भरदिवसा खुनाचं सत्र सुरुच असल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर मयंक खराडे नामक व्यक्तीचा हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे गेल्या 3 दिवसात झालेला हा दुसरा खून आहे. त्यामुळे, शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

     

    पुण्यात आंदेकर खून प्रकरणामुळे चांगलीच खळबळ उडाली असून गेल्या काही महिन्यात अशा घटनांत वाढ झाल्याचं दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी पुण्यात गणेश काळे हत्याप्रकरणाने खळबळ उडाली होती. त्यानंतर, आता 17 वर्षीय मयंक खराडे या युवकाचा खून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या बाजीराव रोडवर खुनाची घटना घडली असून धारदार शस्त्र वापरत आरोपीने खून केल्याची माहिती आहे. या खुनाच्या घटनेचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

    तोंडावर मास्क लावून आले होते आरोपी

    पुण्यात रक्तरंजित थराराची घटना घडली असून 17 वर्षीय तरुणावर वार करून तीन जणांनी त्याचा खून केला आहे. आज दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अभिजीत इंगळे व त्याचा मित्र मयंक खराडे हे त्यांच्या दुचाकीवर जात असताना महाराणा प्रताप उद्यानाच्याजवळ दखनी मिसळच्या समोर अचानक जनता वसाहतमधील तीन तरुणांनी मयंक खराडे याच्या डोक्यात व तोंडावर शस्त्राने वार केले. त्यामध्ये मयंक या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. हे आरोपी तोंडावर मास्क लावून आले होते.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *