• November 5, 2025
  • No Comment

गणेश काळेच्या अंत्यविधीला समीर काळेची जेलमधून बाहेर येत अंत्यविधीला हजेरी

गणेश काळेच्या अंत्यविधीला समीर काळेची  जेलमधून बाहेर येत  अंत्यविधीला हजेरी

    पुण्यात गँगवॉर काही थांबण्याचे नाव घेत नाही. या गँगचे म्होरके जरी जेलमध्ये असले तरी त्यांचे हँडलर्स मात्र सक्रीय असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं. वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचा बदला म्हणून गणेश काळे याचा खून करण्यात आला. गणेश काळे हा कुख्यात गुंड आणि वनराज हत्या प्रकरणातला आरोपी समीर काळे याचा सख्खा भाऊ होता. त्याच्या मृत्यूनंतर त्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी जेलमधून समीर काळे याला अंत्यविधीसाठी जाण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे पोलीसांच्या बंदोबस्तात समीर काळे स्मशानभूमीत पोहोचला होता. त्यावेळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समीर याच्या हालचालींवर सर्वांचेच बारीक लक्ष होते.

    भाऊ गणेश काळे याच्या अंत्यविधीला आरोपी समीर काळे याने हजेरी लावली. त्यासाठी त्याला जेलमधून बाहेर येण्यास परवानगी देण्यात आली. समीर काळे यानेच आपल्या भावावर अंत्यसंस्कार केले. सोमवारी संध्याकाळी गणेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी समीर काळे याच्या आश्रूंचा बांध फुटला. तो धायमोकळून रडू लागला. त्याचे रडणे थांबत नव्हते. आपल्या भावाची हत्या झाल्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तो जोरजोरात रडत होता

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *