- November 5, 2025
- No Comment
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये अतिरीक्त क्लासच्या नावाखाली १७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. ४० वर्षांच्या शिक्षकाने १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केलाचा आरोप कऱण्यात आला आहे. एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली मुलीला बोलवलं अन् विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीने मुलीला धमकावत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये उच्च शिक्षणाच्या पूर्वपरीक्षा क्लासेसमध्ये चेतन चव्हाण नावाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली. आरोपी चेतन चव्हाण या शिक्षकाने दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केला. मुलींना जादा क्लासेसच्या नावाखाली बोलावले. त्यानंतर, एका मैत्रिणीला दुसऱ्या विषयाचा पेपर सोडवण्यासाठी चौथ्या मजल्यावर पाठवले. दुसऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लिफ्टमध्ये नेऊन विनयभंग केला.
शिक्षकाच्या या भयानक कृत्याला पीडित मुलीने विरोध दर्शविला. पण आरोपीने तिला डोळे मोठे करून दम दिला आणि पुन्हा एकदा लिफ्टमधून खाली येताना विनयभंग केला. आरोपी मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने तिच्या मागे लागला, मात्र मुलीने मावशीकडे जायचे असल्याचे सांगून आपली सुटका करून घेतली. घरी पोहोचल्यावर पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्यानंतर, वडिलांनी आणि मुलीने निगडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निगडी पोलिसांनी आरोपी चेतन चव्हाण याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे