• November 6, 2025
  • No Comment

पुणे मयंक खराडेचा हत्या प्रकरण! तीनही आरोपींना अटक

पुणे मयंक खराडेचा हत्या प्रकरण! तीनही आरोपींना अटक

    पुणे:गेल्या काही दिवसापासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. आजही पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. भरदिवसा तीन जणांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे. मयंक खराडे (17 वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाच नाव आहे. ही घटना पुण्यातील बाजीराव रोडवर घडली होती. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले तीनही आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती आहे.

    आरोपी निष्पन्न करुन कारवाई करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पूर्वीच्या भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गुन्हेगांविरोधात विरोधात मोहीम सुरू झाली आहे. अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या गुन्हेगारीबद्दल एक मोठं आव्हान असल्याचे पोलीस अधिकारी म्हणाले. कायदेशीररित्या जे अधिकार आहेत त्यानुसार कारवाई होत असल्याचे पोलीस म्हणाले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *