- November 6, 2025
- No Comment
वाघोली येथून तडीपार गुन्हेगारला धारदार शस्त्रासह गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाकडून अटक

वाघोली : वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉलेजजवळ मोकळ्या मैदानात सापळा रचून तडीपार आरोपीला धारदार शस्त्रासह गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाकडून केली आहे. मंगळवारी (ता. 04) हि कारवाई करण्यात आली आहे. आदित्य दीपक कांबळे (वय 20, रा. सिद्धि विनायक पार्क, हिरा पन्ना स्वीट होमच्या मागे, वाघोली, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार आरोपीचे नाव आहे. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक हद्दीत गस्त गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी नितीन धाडगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आदित्य कांबळे हा रायसोनी कॉलेजजवळील मैदानात थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युनिट 6 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार सदर माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ छापा टाकून कांबळेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकलोखंडी धारदार शस्त्र आढळून आले. तसेच आरोपीवर तडीपार आदेश क्रमांक 05/2025 अन्वये दिनांक 18 मार्च 2025 पासून दोन वर्षांसाठी पुणे शहर व पिंपरी चिंचवड हद्दीतून हद्दपारीचा आदेश आहे.
दरम्यान, सदर आदेशाचे उल्लंघन करून तो परत हद्दीत आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 सह भारतीय हत्यार अधिनियम कलम 4 (25) नुसार वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाघोली पोलिस करीत आहेत.
ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, सारंग दळे, निलेश साळवे, विनायक साळवे, ऋषीकेश व्यवहारे आणि नितीन धाडगे यांच्या पथकाने केली.




