- November 8, 2025
- No Comment
आयटी इंजिनीअरची 14 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबासह तिघांना अटक, दोघे फरार

पुणे: पुण्यात आयटी इंजिनिअरला परदेशातली मालमत्ता, पुण्यातलं घर, जमीन विकायला लावून त्याची 14 कोटींची फसणूक केल्याप्रकरणी भोंदूबाबासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी नाशिकमधून तिघांना अटक केली आहे. वेदिका पंढरपूर नावाच्या महिलेनं अंगात शंकर महाराज येतात असं सांगत इंजिनीअरला सर्व संपत्ती विकायला लावली. त्याच्या मुलींवर उपचारासाठी हे करावं लागेल असं सांगितलं. सगळं विकूनही मुलींच्या तब्येतीत फरक न पडल्यानं आपली फसवणूक झाल्याचं इंजिनिअरच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.




