• November 10, 2025
  • No Comment

पुणे हे विद्येचे माहेरघर नाही तर गुंडांच्या टोळ्यांचे आहे टोळी युद्ध आणि वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच इतक्या टोळ्या सक्रीय

पुणे हे विद्येचे माहेरघर नाही तर गुंडांच्या टोळ्यांचे आहे टोळी युद्ध आणि वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच इतक्या टोळ्या सक्रीय

    पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हटल्या जाते. या पुण्यनगरीला विद्येचे माहेरघर पण म्हटल्या जाते. मुंबईत पूर्वी गँगवार गाजले. दहशतवादी घटनाही मुंबईला हादरवून गेल्या. मुंबईतील विविध डॉनची चर्चा आजही होते. पण पुण्यात शिक्षणासाठी भारतातून विद्यार्थी येतात. परदेशातील विद्यार्थीही येतात. पण गेल्या काही वर्षात पुण्याचा चेहरा मोहरा बदलला आहे. आयटी हब, प्रॉपर्टी हब म्हणून पुणे पुढे आले आहे. त्यातच गुन्ह्यांच्या मालिकांनी पुणेकरांना हादरवून सोडले आहे. तर पोलीस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पुण्यातील टोळी युद्ध कधी थांबणार असा सवाल करण्यात येत आहे. पुण्यात आता वाहनांची तोडफोड करण्याची टूम पुढे येत आहे. भुरटे चोर आणि भुरट्या भाईंना कोण आवर घालणार असा सवाल सर्वसामान्य पुणेकर विचारत आहेत.

    चार टोळ्याचे प्रमुख व अन्य सदस्य अद्यापही जेलमध्ये आहे. पण त्यांचा तुरुंगातूनही बाहेर कारभार सुरू असल्याचा दावा करण्यात येतो. आयुष कोमकर खून प्रकरणानंतर ही गुन्हेगारी विश्वाचा नायनाट करण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. पोलिसांसमोर या टोळ्यांनी आणि टोळी प्रमुखांनी मोठे आव्हान उभे केले आहे. या टोळ्यांचा बिमोड करण्याची मागणी विरोध कपुण्यातील प्रमुख टोळ्या आणि टोळीप्रमुख 1. निलेश घायवळ टोळी 2024 पासून कार्यरत,निलेश बन्सीलाल काहीवळ टोळीप्रमुख एकूण सदस्य : 40

    2. आंदेकर टोळी

    सूर्यकांत उर्फ बंडू रमाकांत आंबेकर टोळीप्रमुख 1970 पासून कार्यरत

    एकूण 52 सदस्य

    3. गजा मारणे टोळी

    गजानन पंढरीनाथ मारणे

    2011 पासून कार्यरत

    एकूण 75 सदस्य

    4. गणेश मारणे टोळी

    गणेश निवृत्ती मारणे टोळी प्रमुख

    2005 पासून कार्यरत

    एकूण 38 सदस्य

    5. शरद मोहोळ

    शरद हिरामण मोहोळ

    5 जानेवारी 2024 रोजी शरद मोहोळ याचा खून

    6. बंटी पवार टोळी

    महेश उर्फ बंटी प्रकाश पवार टोळी प्रमुख

    2015 पासून कार्यरत

    एकूण सदस्य 26

    7. बाबा बोडके टोळी

    कमलाकर उर्फ बाबा बोडके

    सध्या ही टोळी सक्रिय नाही 1995

    एकूण 56 सदस्य

    8. उमेश चव्हाण टोळी

    उमेश छगन चव्हाण कोळी प्रमुख सध्या ही टोळी सक्रिय नाही

    एकूण सदस्य 11

    9. बाबू नायर टोळी

    बाबू प्रभाकर नायर टोळीप्रमुख 2011 पासून सक्रिय

    एकूण 45 सदस्य

    10. अन्वर नवा अन्वर उर्फ नवा अब्दुल रहीम शेख अनवर नव्वा हे मयत आहेत

    11. खडा वासिम उर्फ खडा रफिक शेख वासिम शेख हे मयत आहेत अकरा सदस्यरत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *