- November 10, 2025
- No Comment
आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता पैलवान सनी फुलमाळी याचा सन्मान

नुकत्याच पार पडलेल्या आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत लोहगावचा कुस्तीपटू सनी फुलमाळी याने कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले असून त्याच्या या कामगिरीने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत इतक्या लहान वयात आकाशाला गवसणी घालणाऱ्या युवा पैलवान सनी फुलमाळी याचा शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक निलेशदादा काळभोर यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कळस गावचे युवा नेतृत्व दिनेश (बंटीशेठ)मस्के, अक्षय दळवी,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका उपाध्यक्ष सतीशभाऊ काळभोर, राजेश कदम, नरेंद्र वलटे, केतन गायकवाड उपस्थित होते.




