- November 10, 2025
- No Comment
गुन्हे शाखा युनिट 6 ची कारवाई घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला गावठी पिस्तुल व सोन्याच्या दागिन्यांसह अटक

पुणे: हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपीला गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने अग्निशस्त्र व जिवंत काडतूस व सोन्याच्या दागिन्यांसह ताब्यात घेतले आहेत. हंसराज सिंग उर्फ हँसू रणजित सिंग टाक, (वय 19, रा. तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ, हडपसर), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 18 लाख 22 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता सदरचा मुद्देमाल हा सहकारनगर, चिखली, भोसरी एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, “गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालीत असताना हडपसर येथे शनिवारी (ता. 08) पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले व नितीन मुंढे यांना एका खबऱ्याकडून माहिती
मिळाली की, घरफोडी करणारा सराईत आरोपी हा त्याचे राहत्या परिसरात आला आहे. त्यानुसार त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.




