- November 11, 2025
- No Comment
बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट

कोरेगाव पार्क येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी या कंपनीचा आणखी एक जमीन गैरव्यवहार उघडकीस आल्याची चर्चा होती. मात्र आज पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुण्यातील बोपोडी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठाखुलासा केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून या वादग्रस्त व्यवहारावरून राजकीय चर्चांना उधाण आले होते.
पुढे म्हणाले, मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण आणि बोपोडी जमीन व्यवहार प्रकरण वेगवेगळे आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यावेळी पत्रकार परिषदेत पोलिसांकडून बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार
यांच्या ‘अमेडिया एन्टरप्रायझेस’ आणि शीतल तेजवानी यांचा कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले. कागद पत्रांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.




