• November 11, 2025
  • No Comment

हुक्का बार चालविणार्‍या औंध बाणेर लिंक रोडवरील एका कॅफेवर चतु:श्रृंगी पोलिसांनी छापा:हुक्का पार्लर चालविणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

हुक्का बार चालविणार्‍या औंध बाणेर लिंक रोडवरील एका कॅफेवर चतु:श्रृंगी पोलिसांनी छापा:हुक्का पार्लर चालविणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल

    पुणे : हुक्का बार चालविणार्‍या औंध बाणेर लिंक रोडवरील एका कॅफेवर चतु:श्रृंगी पोलिसांनी छापा टाकला. हा हुक्का बार चालविणार्‍या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फार्म कॅफे असे कारवाई झालेल्या कॅफेचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार वाघेश भीमराव कांबळे (वय ३२) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन कॅफे मालक अमित वाळके (रा. औंध), मॅनेजर बलभीम कोळी (रा. व्हाईट हाऊस हॉटेलजवळ, बाणेर -औंध लिंक रोड, औंध), कॅफे चालक विक्रम कुमार द्वारकाप्रसाद गुप्ता (वय २३, रा. फार्म कॅफे, बाणेर), हुक्का भरणारा वेटर सुरज संजय वर्मा (वय २४), राजकुमार चन्नू अहिरवाल (वय १९, रा. फॉर्म कॅफे, बाणेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाणेर येथील फार्म कॅफे वर पोलिसांनी रविवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर लिंक रोडवरील फार्म कॅफे येथे ग्राहकांना हुक्का पिण्यास दिला जात असल्याची माहिती चतु:श्रृंगी पोलिसांना मिळाली. त्यानुसार औंध – बाणेर लिंक रोडवर आतमध्ये शेतजमीनवर शेड टाकून हा फार्म कॅफे चालविला जात होता. पोलिसांनी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास त्यावर छापा टाकला. त्यावेळी ५ ते ६ ग्राहकांना धुम्रपानासाठी अवैधरित्या तंबाखुजन्य हुक्का पुरविला जात होता. शेडमध्ये विविध कंपनीचे तंबाखुजन्य हुक्क्याचे फ्लेवर ठेवले होते. पोलिसांनी येथून ४८ हजार ६५० रुपयांचे हुक्क्याचे फ्लेवर, २० काचेचे हुक्का पॉट व हुक्क्याचे साहित्य जप्त केले आहे. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय येळे, उमेश कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *