• November 25, 2025
  • No Comment

मोबाईल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावे, यासाठी त्याचे घरातून अपहण करुन दोन पिस्टल काढून त्याच्या डोक्याला लावून धमकी देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्वेतांग निकाळजेकडून 2 पिस्टल जप्त

मोबाईल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावे, यासाठी त्याचे घरातून अपहण करुन दोन पिस्टल काढून त्याच्या डोक्याला लावून धमकी देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्वेतांग निकाळजेकडून 2 पिस्टल जप्त

    पुणे : मित्राचे लग्न असताना मोबाईल टॉवरच्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे द्यावे, यासाठी त्याचे घरातून अपहण करुन दोन पिस्टल काढून त्याच्या डोक्याला लावून “तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू,” अशी धमकी देणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार श्र्वेतांग निकाळजे याला पकडून भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्याकडून २ पिस्टल जप्त केले आहेत. श्र्वेतांग भास्कर निकाळजे (वय ३७, रा. भीमनगर, मंगळवार पेठ) आणि ओम संजय गायकवाड (वय २६, रा. मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत श्वेतांग निकाळजे याची मंगळवार पेठ, तसेच भारती विद्यापीठ भागात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा पिस्तुल बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे निकाळजे याच्याविरुद्ध फरासखाना, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत. येरवडा कारागृहात काही वर्षांपूर्वी निकाळजे आणि साथीदारांनी सांगलीतील एका गुंडावर हल्ला केला होता. या घटनेत गुंड गंभीर जखमी झाला होता. शिवाजीनगर न्यायालयासमोर निकाळजे आणि साथीदारांनी एका साक्षीदारावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. याबाबत शिवा धनराज मुत्याळ (वय ३१, रा. धाबाडी, आंबेगाव) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी यांचा सिंहगड कॉलेज परिसरात स्टॉल असून त्यांनी व निकाळजे यांनी एअरटेल कंपनीचे टॉवरचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते. त्याचे पैसे द्यावेत, यासाठी शिवा मुत्याळ याचे लग्न असताना दोन साथीदारांच्या मदतीने श्वेतांग निकाळजे याने ८ नोव्हेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजता त्याचे अपहरण केले होते. भोर रोडवर उतरुन त्याच्याकडील दोन पिस्टल काढून ते फिर्यादीच्या डोक्यावर लावून “तुला कोणत्या पिस्टलमधून गोळी घालू,” अशी धमकी दिली होती.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *