- November 25, 2025
- No Comment
पिस्तुल बाळगणार्या सराईत गुन्हेगारला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने मंगळवार पेठ परिसरातून अटक
पुणे : पिस्तुल बाळगणार्या सराईत गुन्हेगारला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने मंगळवार पेठ परिसरातून अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि जिवंत काडतुस जप्त केले आहे.
रमजान उर्फ टिपू आदम पटेल (वय ३३, रा. भाजी बाजार, शिरूर, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
गुन्हे शाखेच्या युनिट एकमधील पोलीस अंमलदार हेमंत पेरणे आणि नीलेश साबळे हे मंगळवार पेठेत गस्त घालत होते. त्यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंगळवार पेठेतील कोंबडी पुल येथील जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयाजवळ एक जण उभा असून त्याच्याकडे गावठी कट्टा आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना याची माहिती देऊन पोलीस पथकाने जन्म मृत्यु नोंदणी कार्यालयाजवळ जाऊन तेथे थांबलेल्या रमजान पटेल याला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्याच्या कमेरला ५० हजार रुपंयाचे गावठी पिस्टल व खिशात १ हजार रुपयांचे जिवंत काडतुस मिळून आले. फरासखाना पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध आर्म अॅक्टखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार हेमंत पेरणे, नीलेश साबळे, शशिकांत दरेकर, नितीन जाधव, अनिकेत बाबर, शुभम देसाई, अभिनव लडकत, मयूर भोसले, उमेश मठपती, सिद्धेश्वर वाघमारे, सुहास डोंगरे, युवराज कांबळे, संदेश काकडे, ज्योती मुल्का, रुक्साना नदाफ व मयुरी जाधव यांनी केली आहे.