- November 25, 2025
- No Comment
वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी नागरिकांसमोरच घेतलं ‘टायर’मध्ये; दिले जबरदस्त फटके
पुणे: वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांनी नागरिकांसमोरच घेतलं ‘टायर’मध्ये; दिले जबरदस्त फटके
पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या कोयता टोळीतील आरोपींनापोलिसांनी नागरिकांसमोरच धडा शिकवला. ज्या ठिकाणी गाड्यांची तोडफोड झाली, त्याच ठिकाणी आरोपींना पोलिसांनी शिक्षा दिली. काल फुरसुंगी परिसरात या आरोपींनी २० ते २५ वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे. चारचाकी व रिक्षांची तोडफोड सीसीटीव्हीत कैद झाली होती. तोडफोड करताना घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. पोलिस तपास सुरू आहे.