- November 27, 2025
- No Comment
पिंपरी नितीन गिलबिले हत्येचा मुख्य सूत्रधार माजी नगरसेवकच निघाल्याने प्रचंड खळबळ
पुणे: नितीन गिलबिले खून प्रकरणात मोठा धक्का देणारी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एका माजी नगरसेवकाविरोधात अधिकृतपणे खुनाचा
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किसन महाराज तापकीर असे या माजी नगरसेवकाचे नाव असून पोलीस
तपासात ते या हत्येचे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या सूचनेवरूनच आरोपींनी नितीन गिलबिलेची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
दिघी पोलिसांनी किसन तापकीर यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. 2002 साली ते शिवसेना पक्षाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सध्या ते फरार असून पोलिसांचा त्यांच्यावर शोध सुरु आहे.