- November 27, 2025
- No Comment
पुणे भाड्याने शोरुम घेऊन त्याचे भाडे थकविल्यानंतर मालकाच्या वडिलांच्या डोक्यावर मारहाण करुन जखमी करणारा पोलीस अंमलदार निलंबित

पुणे : पोलीस खात्यात नोकरी करीत असताना डेक्कन जिमखाना येथे असलेले शोरुम भाडेतत्वावर घेऊन त्याचे दीर्घ काळ भाडे थकीत ठेवले. वर शोरुम मालकाच्या कार्यालयात जाऊन शिवीगाळ केली. रात्री मालकाच्या
घरी जाऊन लोखंडी वस्तूने मालकाच्या वडिलांचे डोक्यात व डाव्या हातावर मारहाण करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी या पोलीस अंमलदाराला निलंबित केले आहे.
संदिप ज्ञानेश्वर रोकडे असे या पोलीस अंमलदाराचे नाव आहे. त्याची मोटार परिवहन विभागात नेमणूक करण्यात आली होती. संदिप रोकडे याने पोलीस अंमलदार म्हणून नोकरी करीत असताना प्रयांक किशोर पोरवाल यांचे डेक्कन जिमखाना येथील शोरुम २०२१ मध्ये भाडेतत्वावर घेतले. त्याचे दीर्घ काळ भाडे थकीत ठेवले. या थकीत
रक्कमेची मागणी फिर्यादी यांनी केली असता नंतर देतो, असे सांगून टाळाटाळ केली. फिर्यादी यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांना वेळोवेळी शिवीगाळ केली. १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी यांच्या घरी संदिप रोकडे गेला. त्याने लोखंडी वस्तुने फिर्यादीच्या वडिलांचे डोक्यात
व डाव्या हातावर मारहाण करुन जखमी केले. अशा प्रकारे एक बेजबाबदार आणि शिस्तबद्ध पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे अशोभनीय वर्तन केल्याने पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी संदिप रोकडे याला निलंबित केले आहे.




