- November 27, 2025
- No Comment
येरवडा-लक्ष्मीनगरमध्ये दहशत माजवणाऱ्या गुंडाची पोलिसांनी काढली धिंड

पुणे: पोलिसांच्या नाकावर टिच्चून बर्थडे साजरा करणाऱ्या कुख्यात आणि रेकॉर्डवरील गुंड समीर शेखला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. सोबतच अटक केल्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगाराची धिंड देखील काढली आहे. पोलिसांनी सूचना देऊन देखील अनेक लोकांना जमा करत वाढदिवस साजरा करणे गुंड समीर शेख भोवलंय. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत या कथित भाईने मोठं बर्थडे सेलिब्रेशन केलं होतं. परिणामी पोलिसांच्या नाकावर टिच्चून बर्थडे करणाऱ्या या कुख्यात गुंडाची पुरती हाव उतरवत पोलिसांनी त्याला आता अटक केलीय.
पुण्यातील येरवडा परिसरात असणाऱ्या लक्ष्मी नगरमध्ये या रेकॉर्डवरील गुन्हेगाराने महिलांना धमक्या देणे, धारदार शस्त्राने वाहनांची तोडफोड करणे आणि परिसरात दहशत पसरवण्यासाठी अनेक नागरिकांवर हल्ले केले होते. याच दहशत वाजवणाऱ्या आरोपीची पोलिसांनी अटक करत धिंड काढली आहे. तर समीर शेख हा एका हत्ये प्रकरणातील देखील आरोपी आहे. मागील आठवड्यात समीर शेख यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना एकत्रित करत वाढदिवस साजरा केला होता.




