• December 10, 2025
  • No Comment

हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतर गोंधळ, नातेवाइकांकडून तोडफोड; पोलीस तपास सुरू

हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या मृत्यूनंतर गोंधळ, नातेवाइकांकडून तोडफोड; पोलीस तपास सुरू

    प्रतिनिधी : सचिन गाडे

    पुणे :हडपसर परिसरातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या एका रुग्णाचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या मृत्यूनंतर संतप्त नातेवाइकांनी आणि समर्थकांनी रुग्णालयात गोंधळ घालत तोडफोड केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    मृत रुग्ण हे शिवसेना (शिंदे गट) वैद्यकीय कक्षातील शहर पदाधिकाऱ्याचे वडील असल्याची माहिती आहे. रुग्णावर शस्त्रक्रिया सुरू असताना अचानक प्रकृती खालावली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. मात्र, रुग्णाच्या नातेवाइकांनी वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप करत रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले.

    मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक आणि समर्थकांनी सह्याद्री हॉस्पिटलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठा गोंधळ घातला. यावेळी रिसेप्शन परिसरातील काचेच्या भिंती, खुर्च्या तसेच इतर साहित्याचे नुकसान करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला पांगवले.

    दरम्यान, सह्याद्री हॉस्पिटल प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करत संबंधित रुग्ण गंभीर अवस्थेत, मल्टी ऑर्गन फेल्युअरच्या स्थितीत दाखल करण्यात आला होता, अशी माहिती दिली. उपस्थित वैद्यकीय तज्ज्ञांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच रुग्णालयातील तोडफोड व नुकसानप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

    या प्रकरणी पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, तोडफोड करणाऱ्या काही संशयितांची ओळख पटवण्यात आली आहे. पुढील चौकशी सुरू असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *