- September 22, 2022
- No Comment
कोंढवा:आमली पदार्थ विरोधी पथक पाच ची मोठी कारवाई, सव्वा पाच लाखांचा गुटखा जप्त
कोंढवा: कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत पुणे पोलिसांच्या आमली पदार्थ विरोधी पथकाने 5 लाख 29 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
नेमाराम लच्छाराम प्रजापती (वय 38 रा. पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांना खबर मिळाली होती की, येवलेवाडी येथे पानमसाला, गुटखा एकाने विक्रीसाठी साठवून ठेवला असून तो लवकरच तेथून तो माल हलवणार आहे. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
त्याच्याजवळून पोलिसांनी 5 लाख 29 हजार 210 रुपयांचा गुटखा मिळाला पोलिसांनी कोढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर, लक्ष्मण ढेंगळे, पोलीस अमलदार सुजित वाडेकर, पांडूरंग पवार, संदिप शिर्के, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, राहूल जोशी, मनोजकुमार साळुंके, मारूती पारधी, विशाल दळवी, संदेश काकडे, रेहना शेख, नितेश जाधव यांनी केली.