- September 22, 2022
- No Comment
अट्टल गुंड दीड लाखांच्या हत्यारा सकट अटक, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनची कामगिरी
पुणे: अट्टल गुंडाचा पाठलाग करून त्याच्याकडून दोन पिस्टल व तीन गावठी कट्टे व 3 राऊंड असा एकूण 1 लाख 41 हजारांचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा 2 यांनी केली आहे. पुणे पोलिसांनी या कारवाई सह दोन महिन्यात 13 शस्त्रे जप्त केली आहेत.
रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (रा.निगडी प्राधिकरण) असे अटक आरोपीचे नाव असून दुध्या ला समर्थ पोलिसांनी दोन वर्षाकरीता तडीपार केल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करण्याचे प्रमाण वाढले आहे. याच अनुशंगाने युनिट दोनचे अधिकार क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टिम काम करत आहे. याच टिम मधील सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे हे गस्त घालत होते. यावेळी त्यांना खबर मिळाली की, तडीपार दुध्या हा मंगळवार पेठ येथे आला असून त्याच्याजवळ शस्त्र आहेत.
त्यानुसार पोलिस घटनास्थळी पोहचले. मात्र त्याला सुगावा लागल्याने त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक काळ्या रंगाचे रिव्हॉल्वर, एक गावठी पिस्टल, एक मॅगेझीन असा 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलीस कस्टडी घेतली असता आरोपीने लपवून ठेवलेले एख पिस्टल व दोन गावठी कट्टे व तीन जिवत काडतुसे ही पोलिसांच्या स्वाधिन केले. असा एकूण 1 लाख 41 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.