• October 1, 2022
  • No Comment

लैंगिक अत्याचार करत महिलेला सहासष्ट लाखांना लुटले

लैंगिक अत्याचार करत महिलेला सहासष्ट लाखांना लुटले

    देहु: लैंगिक अत्याचार करत महिलेला जबरदस्ती जमीनीचा व्यवहार करायला लावून तिची 66 लाखांची फसवणूक करणाऱ्या दोघांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे.

    प्रदिप फक्कड कोळी (वय 30 रा.तळेगाव दाभाडे) व देवा विलास सोनावणे (वय 32 रा. वडगाव मावळ) अशी अटक आरोपींची नावे असून अंकुश सोनावणे य़ाच्या विरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. याप्रकरणी 33 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी कोळी याने पवनानगर येथील जमीन चांगली आहे ती तुझी एफडी मोडून घे, तसेच तुझ्यात माझ्यात जे झाले ते कोणाला सांगू नको,नाही तर तुला व तुझ्या मुलीला पुढे-मागे कोणी नाही एकेदिवशी गायब करेन अशी धमकी दिली. त्यावरून जानेवारी 2022 मध्ये शेवटच्या आठवड्यात फिर्यादी या अंकुष सोनावणे याच्या घरी गेल्या व त्यांना विचारले की मला एक जमीन दाखवली व दिली दुसरी असे का, तर हे सारे व्यवहार कोळी बघत असल्याचे सांगीतले.

    या कारणावरून कोळी सतत फिर्यादीच्या घरी येऊ लागला. त्याने फिर्यादीला लग्नाची मागणी घालून जबरदस्ती शारीरिकसंबंध प्रस्थापीत केले. दरम्यान जमिनीच्या व्यवहाराचा बहाणा करून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी सुमारे 66 लाख रुपये उकळले व फिर्यादी यांना जमिन न देता त्यांची फसवणूक केली. शारीरिक अत्याचार व आर्थिक फसवणूक यामुळे फिर्यादी यांना धक्का बसला होता. त्यातून मानसीक स्थिती सावरल्यानंतर त्यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *