- October 2, 2022
- No Comment
आमदाराला खंडणी चा फोन, सराईत टोळका गजाआड
बिबवेवाडी: पुण्यातील माजी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयात फोन करून खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलिसांनी तेलंगणातून अटक केली.
पुण्यातील माजी नगरसेवक बाबा उर्फ दिपक मिसाळ यांना फोन करून तसेच मेसेजद्वारे पैशांची मागणी करणारा व पैसे नाही दिले तर जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी तेलंगणा येथून अटक केली आहे. ही कारवाई बिबेवाडी पोलिसांनी केली आहे.
इम्रान समीर शेख (रा.घोरपडीगाव, पुणे) असे अटक आरोपीचे नाव असून त्याला न्यायालयाने 3 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा मिसाळ यांना एका अनोळखी क्रमांकावरून 18 ते 23 सप्टेंबर या कालावधीत त्यांच्या फोनवर व त्यांची भावजय माजी आमदार माधुरी मिसाळ यांच्या कार्यालयातील फोनवर पैशांची मागणी करणारे फोन व मेसेज येत होते. तसेच पैसे नाही दिले तर ठार मारून टाकण्याची धमकी ही आरोपीने दिली.
यावरून बाबा मिसाळ यांनी बिबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. बिबेवाडी पोलीस याचा तपास करत असताना तांत्रीक तपासातून हा क्रमांक इम्रान शेख याचा असल्याचे समोर आले.
पोलिसांनी इम्रान शेख याच्या पुण्यातील घराचा पत्ता शोधला, मात्र तो राहते घर सोडून गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी क्रमांकाच्या लोकेशनची माहिती काढली असता, मिसाळ यांना तेलंगणा येथील कामारेड्डी येथून फोन येत असल्याचे समोर आले.
पोलिसांचे एक पथक तात्काळ तेलंगणा येथे गेल व त्यांनी शेख याला अटक केले. पोलीस तपासात इम्रान शेख याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात या आधीच फसवणूक, धमकावणे असे दोन गुन्हे दाखल असून तो या गुन्ह्यात फरार असल्याचे समोर आले. यागुन्ह्यात वापरलेला मोबाईल व सिमकार्ड पोलिसांनी जप्त केले आहे.
सदरची कारवाई बिबेवाडी पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस अमंलदार श्याम लोहोमकर, सतीश मोरे, तानाजी सागर यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर करत आहेत.