विटकर टोळीवर मोक्का,चतुःश्रुंगी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
- क्राईमपुणे
- October 2, 2022
- No Comment
पुणे: चतुःशृंगी परिसरात दहशत पसरविणाऱ्या विटकर टोळीतील टोळी प्रमुख अजय विटकर सह त्याच्या सहा साथीदरांना अटक करत चतुःश्रृंगी पोलिसांनी मोक्का अतंर्गत कारवाई केली आहे.ही चालू 2022 या वर्षातील 35 वी मोक्का अंतर्गत केलेली कारवाई आहे.
टोळी प्रमुख अजय चंद्रकांत विटकर (वय 20 रा.वडारवाडी), त्याचे साथीदार विजय चंद्रकांत विटकर (वय 18 रा. वडारवाडी), दत्ता रविंद्र धोत्रे (वय 22 रा.वडारवाडी), सागर मनोहर धोत्रे (वय 27 रा. वडारवाडी), सिध्दार्थ शंकर गायकवाड (वय 23 रा. वडारवाडी), कृष्णा उर्फ किच्ची राजेश माने (वय 25 रा.वडारवाडी) यांना अटक केली असून त्यांचे दोन साथीदार अतुल धोत्रे (वय 22) व विजय उर्फ चपाती विटकर (वय 23) हे अद्याप फरार असून त्यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे पोलिसांनी वेळोवेळी प्रतिंबधात्मक कारवाई करूनही परिसरात दहशत पसरवीत होते. त्यांच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे, परिसरात टोळीच्या वर्चस्वासाठी दहशत पसरवणे, नागरिकांना धमकावणे, मारामारी, जमाव जमवून दंगा किंवा दहशत निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांच्या या गुन्हेगारीला आळा बासावा म्हणून मोक्का अतंर्गत पोलिसांनी कारवाई केली. याचा पुढिल तपास खडकी विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे या करत आहेत.
सदरची कारवाई सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांनी दिलेल्या सुचनांवरून चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंकुश चिंतामण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक, पोलीस अमंलदार अमित छडीदार, अमित गद्रे यांनी केली.