विजय मानेंची हायकोर्टात धाव

    विजय मानेंची हायकोर्टात धाव

    मुंबई: विजय माने हे उच्च शिक्षित असून पुण्यात राहतात. दिसायला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे दिसतात, म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात.

    सध्या राजकीय वर्तुळातील ‘सेम टू सेम’ चेहऱ्याची अधिक चर्चा आहे, ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे ड्युप्लीकेट विजय माने यांची. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याशी साम्य असल्यामुळे माने कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर आक्षेप घेत माने यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसतो, त्यात माझा दोष काय? असा सवाल उपस्थित करीत माने यांनी स्वतःविरोधातील गुन्हा रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे.

    पुणे पोलिसांना उत्तर देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

    या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने पुणे पोलिसांना या संदर्भात नोटीस जारी केली आहे. त्याचबरोबर त्यांना 18 ऑक्टोबरपर्यंत आपलं उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई हायकोर्टात न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे आणि न्यायमूर्ती मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी न्यायालयाने हे निर्देश दिलेत.

    विजय माने हे उच्च शिक्षित असून पुण्यात राहतात. दिसायला ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखे आहेत, म्हणून ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात. लोक त्यांना बोलावतात. त्यांना मुख्यमंत्री शिंदे समजून मान दिला जातो. काही ठिकाणी त्यांची विडिओ क्लिप बनवून व्हायरल केली जाते.

    या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असा भास लोकांना होतो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा समर्थकांमध्ये नाराजी आहे. मुख्यमंत्री यांची प्रतिमा माने यांच्या व्यवहारामुळे मलिन होत असल्याचा आरोप शिंदे समर्थकांचा आहे.

    या कारणातून शिंदे समर्थकांनी विजय माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात विजय मानेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मात्र सदर गुन्हा रद्द करण्यासाठी विजय माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. माने यांच्या याचिकेची दखल घेऊन हायकोर्टाने संबंधितांना नोटीस जारी केल्या आहेत.

     

     

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *